बुलेट ट्रेन रोखा, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणं अमानवीय - राहुल गांधी

Thote Shubham
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये (डीए किंवा Dearness Allowance) वाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अमानवीय आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.


“केंद्र सरकार लाखो कोट्यवधी रुपयांची बुलेट ट्रेन आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यीकरण परियोजना निलंबित करण्याऐवजी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता रोखत आहे.

हे अमानवीय आणि असंवेदनशील आहे. केंद्रीय कर्मचारी कोरोनाविरोधाच्या लढाईत झटत आहेत आणि जनतेची सेवा करत आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात कुठलीही वाढ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सर्व कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात जुलै 2021 पर्यंत कुठलीही वाढ होणार नाही.

संरक्षण आणि रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्राचा हा नियम लागू असेल. गेल्याच महिन्यात महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा झाली होती, मात्र ही वाढ आता स्थगित झाली आहे.


1 जानेवारी 2020 ते जुलै 2021 या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढ मिळणार नाही. म्हणजेच जवळपास दीड वर्ष या सरकारी लाभधारकांना अधिकचा भत्ता मिळणार नाहीत. सर्व कर्मचारी आणि लाभधारकांना सद्यस्थितीतील वेतनानुसार भत्ता मिळेल, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

https://mobile.twitter.com/RahulGandhi/status/1253611850173825025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1253611850173825025&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fnational%2Frahul-gandhi-slams-modi-government-on-central-employees-da-cut-211015.html

Find Out More:

Related Articles: