शिवसेना हा अत्यंत कन्फ्यूज्ड पक्ष - देवेंद्र फडणवीस
ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. त्यामुळे ते लोकसभेत ते वेगळं बोलतात आणि राज्यसभेत वेगळं बोलतात.”फडणवीस पुढे म्हणाले, “शिवसेनेने आधी त्यांची भूमिका ठरवली पाहिजे. शिवसेने शेतीसंदर्भात कधी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे मी आता त्यांना आव्हान करतो की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी शाश्वती घ्यावी, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.”