कोरोना : खोटी माहिती रोखणार विकीपीडियाचा हा खास प्रोजेक्ट

Thote Shubham

कोरोना व्हायरस महामारीने भारतात थैमान घातले आहे. यासोबतच या व्हायरसबाबतची खोटी माहिती देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरली आहे. यामुळे लोकांपर्यंत खरी व विश्वसनीय माहिती मिळत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस संदर्भातील खोटी माहिती रोखण्यासाठी विकिपीडियाने एका खास प्रोजेक्टरवर काम करत आहे.


विकिपीडियाच्या या खास प्रोजेक्टचे नाव SWASTHA आहे. या प्रोजेक्टचे संस्थापक अभिषेक सुर्यवंशी म्हणाले की, विकिपीडियावरील लेखांना सीडीसी आणि डब्ल्यूएचओच्या साईटच्या तुलनेत 10 पट अधिक वाचले जाते. विकिपीडियावर दररोज जवळपास 10 लाख युजर्स 1 लेख वाचतात.


सुर्यवंशी म्हणाले की, भारत सरकारकडे कोरोना व्हायरसशी संबंधित खूप माहिती आहे. तर विकिपीडियाकडे यूजर्स आहेत, मात्र कंटेट नाही. आम्ही लवकरच कंटेटमध्ये बदल करून, लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवू.


SWASTHA सध्या केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाशी मिळून काम करत आहे. याशिवाय डब्ल्यूएचओ आणि या व्हायरसच्या तंज्ञांची देखील मदत मिळत आहे. काही दिवसांपुर्वी विकिपीडियाने कोरोना व्हायरसशी माहिती हिंदी, बंगला, तमिळ, भोजपुरी, अरबी, कन्नड, मल्याळम, तेलगू आणि उर्दू भाषेत उपलब्ध केली होती.

Find Out More:

Related Articles: