तब्बल चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा अनुभवता येणार ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार

Thote Shubham

बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांची भूमिका असलेल्या आणि जवळपास चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाचा रिमेक बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जॅकी भगनानी आणि जूनो चोपडा निर्मित या चित्रपटाची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 

बॉलिवूडमध्ये ८०च्या दशकात ‘द बर्निंग ट्रेन’ हा सुपरहिट चित्रपट ठरला होता. विनोद खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, डॅनी, विनोद मेहरा, हेमा मालिनी, परवीन बाबी आणि नीतू सिंह यांसारखे त्याकाळातील लोकप्रिय कलाकार या चित्रपटात होते. आता याचित्रपटाचा रिमेक बनवण्यात येणार आहे.

 

या चित्रपटाच्या रिमेकमधील कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील. हा मल्टी स्टारर चित्रपट असल्याने रिमेकमध्ये कोणते बॉलिवूडमधील नवे कलाकार पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. काही महिन्यात कलाकारांची निवड करुन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.                                                                                                                                               

 

Find Out More:

Related Articles: