तर शिमल्यातील प्रियंका गांधींचं घरही पाडू भाजपाच्या महिला नेत्याचे वक्तव्य

Thote Shubham
कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने कंगणाच्या ऑफिसवर कारवाई करत तोडफोड केली. याचवरून मोठा वाद झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख महिला नेत्याने राज्यातील प्रियंका गांधी यांचा बंगला पाडला जाऊ शकतो असा इशारा दिला आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा छराबडामध्ये एक मोठा बंगला आहे. शिमल्यापासून 13 किमी दूर हा प्रियंका गांधी याचा हा बंगला आहे. याच बंगल्यासंदर्भात महिला मोर्चाच्या प्रमुखांनी हे भाष्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचलमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख शाशिम धर सूद यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. शाशिम धर सूद यांनी एका व्हिडीयोमध्ये प्रियंका गांधी यांचा बंगला पाडण्याचा इशारा दिला होता.

सूद त्यांच्या व्हिडीयोमध्ये म्हणतात, शिमल्यात घर बांधणाऱ्या आणि काँग्रेस की बेटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रियंका गांधीनाही सोडणार नाही. आम्ही आश्वासन देतो की आम्ही त्यांचं घरही तोडू.” मात्र हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सूद यांच्या वक्तव्यायला सहमती दर्शवली नाही.



Find Out More:

Related Articles: