थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळ नाही, उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला

Thote Shubham
उद्धव ठाकरे यांना थिल्लरबाजी करणं शोभत नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझ्यासमोर माझी जनता आहे. शेतकरी आहे. थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळच नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावलाय.
सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड रोखण्यासाठी महाराष्ट्राने ज्यापद्धतीने आरोग्य सेवा उभ्या केल्या तशा आरोग्य सेवा देशातील एकाही राज्यात निर्माण झाल्या नसतील, असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय.
फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, याकडे बघायला मला वेळच नाही. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझे लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही.

Find Out More:

Related Articles: