महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण

frame महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण

Thote Shubham
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढत   चालला आहे. गेल्या 24 तासात 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1 हजार 206 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. आज एका दिवसात 66 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

तर काल एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 206 वर पोहोचला आहे. सुदैवाने आज एका दिवसात 15 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दरम्यान आतापर्यंत 125 अधिकाऱ्यांना आणि 1081 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीलागण झाली आहे. यात कोरोनाची लक्षण असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे.

आतापर्यंत 90 अधिकारी आणि 822 कर्मचारी अशा एकूण 912 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. तर 34 अधिकारी आणि 249 पोलीस कर्मचारी असे एकूण 283 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 11 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More