राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

Thote Shubham
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 7 करोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईचे 5 आणि पुण्यातील 2 जण आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. तर 6 जण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 5 रुग्णांमध्ये ( 71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.

Find Out More:

Related Articles: