मनसे अध्यक्ष राज ठाकरे विना मास्क मंत्रालयात

Thote Shubham
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी चेहऱ्याला मास्क न लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही, असं मोघम उत्तर देत, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.


‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावण्याचा नियम असूनही राज ठाकरे यांनी तो का पाळला नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी केवळ स्मितहास्य केलं.

अखेर, ‘याचं कारण म्हणजे सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही’ असं उत्तर देत राज ठाकरे निघाले. या बैठकीला उपस्थित राहिलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही मास्क लावला होता.

खरं तर मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही, अशा कडक सूचना ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या आहेत. मंत्रालयात अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरानाचा संसर्ग वाढत असतानाच मुंबई सर्वात मोठा हॉटस्पॉट झाला आहे. घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही, तर नियमभंग करणाऱ्यांना थेट बेड्या ठोकण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

Find Out More:

Related Articles: