महिला अत्याचाराच्या घटनांवर मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांनी गप्पं राहणं हे राज्याचं दुर्दैव- चित्रा वाघ

Thote Shubham

कोविड सेंटरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने आजपर्यंत किती दोषींवर कारवाई केली?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केलाय.

चित्रा वाघ यांनी आज पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यासह राज्यातील महिलांच्या कोविड सेंटरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना महिला अत्याचारांवर घटनांवर व्यक्त देखील न व्हावंसं वाटणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Find Out More:

Related Articles: