मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी अलर्ट करणार व्हॉट्सअ‍ॅप

Thote Shubham

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप या जगप्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅपवर लवकरच एक नवीन फिचर रोलआउट करण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून कोणताही मेसेज दुसऱ्याला फॉरवर्ड करण्यापूर्वी यापुढे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीला अलर्ट केले जाणार आहे.

 

याबाबत माहिती देताना व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, लवकरच एक नवीन फिचर आम्ही लॉन्च करणार असून Check It Before You Share असे त्याचे नाव असणार आहे. युजर्सला हे फिचर एका प्रकारे अलर्ट करणारे असून एखाद्या मेसेज बाबतची खात्री पटवण्यास सांगणार आहे. फेक न्यूजवर लगाम लावण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या आणि माहिती वेगाने व्हायरल होत आहेत. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपचे असे म्हणणे आहे की, या फिचर मागे कंपनीचा उद्देश एखाद्या मेसेज बाबत अधिक माहिती मिळवण्याची सवय लावणे आहे.

कंपनीने असे ही स्पष्ट केले आहे की, युजर्सला एखादा मेसेज मिळाल्यावर किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी MyGov हेल्पलाईन किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची पुष्टी करुन घ्यावी लागणार आहे.


दरम्यान, यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने कोरोनाच्या व्हायरस संदर्भात जागृकता निर्माण करणे आणि त्यासंबंधित चुकीची माहिती पसरण्यावर चाप बसवण्यासाठी चॅटबॉट लॉन्च केले होते. MyGOv Corona Helpdesk असे याचे नाव होते.

याच्या माध्यमातून युजर्सला कोरोनासंबंधित प्रश्न विचारता येणार आहेत. तसेच सरकारकडून आरोग्य सेतू अ‍ॅप लॉन्च करण्यात आले असून तेथे कोरोनासंबंधित सर्व अपडेट आणि माहिती दिली जात आहे.

Find Out More:

Related Articles: