
दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये - रामदास आठवले
दलित अत्याचार जिथे होईल तिथे मी पोहोचलो आहे. दलित अत्याचाराविरूद्ध मी लढलो आहे. मी दलित पँथरच्या चळवळीतून पुढे आले आहे. त्यामुळे दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.दरम्यान, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की माहित नाही पण मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असल्याचं आठवले म्हणाले.