राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा

Thote Shubham

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत उभारले जाणाऱ्या राम मंदिराला 1 कोटी रुपये दान करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारला 100 दिवस झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी परिवारासह अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण सर्व रामभक्त मिळून मंदिर उभारू. मी भाजपपासून वेगळा असलो तर हिंदूत्वापासून वेगळा नाही. यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांसाठी भवन निर्माण करण्यासाठी जागा देण्यात यावी.

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, सौभाग्याची गोष्ट आहे की मागील दीड वर्षात तिसऱ्यांदा येथे येत आहे. एक प्रश्न मनात होता की मंदिर केव्हा बनेल ? जेव्हा 2018 मध्ये येथे आला होतो, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीची माती घेऊन आलो होतो. पहिल्यांदा आलो होतो, त्यावेळीच म्हणालो होतो की वारंवार येईल. योगी आदित्यानाथ यांनी जमीन दिल्यास महाराष्ट्र भवनाची निर्मिती केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. कोरोना व्हायरसमुळे शरयू आरती आणि जनसभेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.                                                                                               

Find Out More:

Related Articles: