
राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरे म्हणतात…
मुंबई – कोहिनुर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. तसेच गुरुवारी राज ठाकरेंचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यावर पहिल्यांदाच शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज ठाकरे यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीत काही मिळेल असे मला वाटत नाही. त्यामुळे २ दिवस थांबायला काही हरकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, बुडीत निघालेली आयएल ऍण्ड एफएस कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे, यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल, आयएल ऍण्ड एफएस कंपनीचे बरेच व्यवहार संशयास्पद आहेत. यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशासाठी ईडीच्या रडारवर आहेत.