सानिया मिर्झाने जिंकले Hobart International Tennis स्पर्धेचे जेतेपद

Thote Shubham

बाळतंपण आणि नंतर मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दूर असलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केले आहे. सानियाने WTA Hobart International Tennis स्पर्धेत आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सानिया-नादीया जोडीने अंतिम फेरीत चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. सानिया मिर्झा आणि तिच्या साथीदाराने हा सामना अवघ्या १ तास २१ मिनीटांत खिशात घातला.

 

सानिया मिर्झाने तब्बल दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दुहेरीमधील सानियाचे हे ४२ वे विजेतेपद ठरले. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ चे ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचे जेतेपदही जमा असल्यामुळे सानिया आगामी काळात टेनिसमध्ये कशी प्रगती करते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

 

Find Out More:

Related Articles: