मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार – चंद्रकांत पाटील

frame मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार – चंद्रकांत पाटील

Thote Shubham

महाराष्ट्रातही मध्यप्रदेशप्रमाणेच महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, सहा महिन्यात ते पडेल, असे दावे भाजप नेत्यांनी केले आहेत.

 

पाटील याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

 

तसेच महाविकास आघाडी सरकार भाजप पाडणार नाही. तर ते त्यांच्यातील विसंवादामुळे पडेल, असं देखील पाटील यावेळी बोलताना म्हणाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्यापर्यंत हे सरकार पडेल, असे भाकीत केले आहे.

 

दरम्यान, ‘महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते नाराज असून ते लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल,’ असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.                                                                                                                              

 

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More