जिवलग व्यक्तींच्या प्रेमाखातर अनेकांनी वेगवेगळे निश्चय करत आपली निष्ठा सिध्द करण्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत.मात्र आपल्या प्राणप्रिय नेत्याच्या विजयाचा गुलाल जोपर्यंत अंगावर पडत नाही तोपर्यंत पायात चप्पलच घालणार नाही असा आगळा वेगळा निश्चय एखाद्या कार्यकर्त्यांने केला असेल तर त्यात नवल वाटायला नको!
कारण रोहित पवार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या जामखेड येथील पिनू मुळे व बंटी डिसले या दोन युवकांनी हा निश्चय केल्याने त्यांच्या या आपुलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मा.क्रुषिमंत्री आदरणीय शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात समाजकार्यातुन आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी शिक्षण,पाणी,रोजगार,नोकरी,रस्ते आदींबरोबरच अनेक क्षेत्रात येथील जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली आहे. हुबेहूब शरद पवार यांचीच छबी रोहित पवार यांच्यामध्ये पहावयास मिळत असल्याचा सुर सर्वत्र उमटत आहे.
शरद पवार यांची स्मरणशक्ती,प्रेमळ स्वभाव,आणि कार्यकर्त्यांनी देण्यात येणारे पाठबळ हे गुण राज्यभर परिचयात आहेत. हाच रोहित पवार यांच्यातील गुण अनेकांना भुरळ घालतो.म्हणुनच कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी रोहित पवार हे जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत शर्ट घालणार नाही,दाढी करणार नाही,लग्न करणार नाही असे वेगवेगळे निश्चय केले आहेत.
त्यातच जामखेड मधील या युवकांनी ‘चप्पल घालणार नसल्याचा निश्चय’ रोहित पवार यांच्यावर असलेले निस्सीम प्रेम आणि आदराची भावना व्यक्त करतो.असे असले तरी रोहित पवार यांच्या विजयासाठी दोन्हीही तालुक्यातील तरुणांनी आपली कंबर कसली आहे हे मात्र खरे!