घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thote Shubham

मुंबई : करोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून राज्यातील करोना बाधितांची संख्या आता 47 वर पोहोचली आहे. त्यामुळं राज्य सरकार सावध झाले असून लवकरच 'लॉक डाउन'सारखा एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही. हे विषाणूंशी युद्ध आहे. युद्धाचा भोंगा वाजलाय युद्धाच्या काळात रात्री दिवे घालवले जायचे.

 

शत्रूला आपली माहिती कळू नये म्हणून काळजी घ्यावी लागली. आता पण आम्ही सांगतोय ते ऐका. अस आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच लोकल ट्रेन आणि बसमधली गर्दी कमी झाली आहे, पण ती पूर्ण बंद व्हायला हवी. विषाणू हळुहळू एक-एक पाऊल पुढे टाकतोय.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, हे संकट जात-पात-धर्म पाहत नाही. सगळ्यांनी एकजुटीने लढायला हवं. आपण शिवरायांचे लढवय्ये आहोत. या संकटावर आपण मिळून मात करू याची मला खात्री आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. सरकार सर्व काही बंद करू शकतं, पण तसं करायची आमची इच्छा नाहीये. कृपा करा आणि ट्रेन-बसची गर्दी कमी करा. घराबाहेर कुणी पडू नका. असही आवाहन त्यांनी यावेळी केले.                                                               

Find Out More:

Related Articles: