रमझानच्या महिन्यात घरातच नमाज पठण करा; शरद पवारांचं आवाहन

Thote Shubham
मुंबई : रमझानच्या कालावधीमध्ये घरातच बसून नमाज पठणं करावं. या कालावधीत सरकारनं कोणतीही सुट दिलेली नाही. सर्वांनी आपल्या घरातच नमाज पठण करावं आणि इफ्तार करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं.


मंगळवारी त्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. रमझानसाठी आपण आपल्या घरातच नमाज पठाण करू शकता. सरकारकडून रमझानसाठी सुट देण्यात आलेली नाही. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सहकार्याची आवश्यकता असते. रोजा सोडण्याची जेव्हा वेळ असेल तेव्हा घरातच रोजा सोडा, असं शरद पवार यावेळी म्हणाले.


यंदाची परिस्थिती वेगळी आहे. करोनासारख्या संकटांचा सामना करणं हे आपल्या सर्वांचं ध्येय आहे. त्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळणं हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी हे संकट गंभीरपणे घेऊन रमजानच्या काळात घराबाहेर पडू नये. त्यांनी घरातच नमाज पठण करावं.

घरातच इफ्तार करावा, असं आवाहन करतानाच घराच्याबाहेर जाऊन नमाज पठण करण्याची राज्य सरकारने कुणालाही सूट दिलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या महामारीपासून देशवासियांची सुटका करण्याची अल्लाहकडे घरीच राहून प्रार्थना करा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना पवार म्हणाले,मुंबई, पुण्यात लॉकडाउनच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करा. लॉकडाउनमुळे देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत स्थिती बरी पण समाधानकारक नाही. सध्याच्या परिस्थितीत नकारात्मकता कमी करणं आवश्यक आहे. पालघरवरुन कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण केलं जातय.

Find Out More:

Related Articles: