नांदेडमध्ये 20 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, संख्या 26 वर
श्री गुरुद्वारा लंगर साहिब येथील परिसरातील 97 व्यक्तींचे 30 एप्रिल व 1 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांच्या घशाच्या द्रवाचे, स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, त्यांची चाचणी केल्यानंतर 20 जणांना कोरोनाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 25 जन निगेटीव्ह आहेत. 11 स्वँब हे अनिर्णयीत आहेत. तर उर्वरित 41 जनाचे आवहाल प्रतिक्षेत आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
सदर सर्व व्यक्तींना एन.आर. आय. भवन कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस नांदेड मध्ये रुग्णांची वाढ होत असल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.