वाढदिवस ‘केजीएफ’च्या अभिनेत्याचा केक ५ हजार किलोचा

Thote Shubham

८ जानेवारीला ‘केजीएफ’ या बहुभाषिक चित्रपटाचा कन्नड सुपरस्टार यश याचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या चाहत्यांनी यासाठी मोठी तयारी देखील केली होती. वाढदिवशी यशचे २१६ फूट उंच कटआऊट लावण्यात आले होते. तर यावेळी ५००० किलोचा केक कापण्यात आला. २० लोकांना हा केक बनवायला तब्बल ९६ तास लागले होते. हा केक ४० फूट रुंद आणि ७० फूट लांब एवढा होता. या विक्रमी केकची वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडियाच्या वतीने नोंद घेण्यात आली. त्याचबरोबर त्याबाबत सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.

 

दोन वर्षानंतर अभिनेता यश आपला वाढदिवस साजरा करत होता. दोन वर्षापूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केली होती. तो २०१९ मध्ये ‘केजीएफ’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे यावर्षीचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांनी जोरदार साजरा करण्याचे ठरवले होते. त्याच बरोबर यश याच्या ‘केजीएफ’ चित्रपटाला देशभर तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने २५० कोटीचा व्यवसाय केला. केजीएफ हा एवढी कमाई करणारा पहिलाच कन्नड चित्रपट ठरल्यामुळे जोरदार सेलिब्रेशन चाहत्यांनी केले.                                                                                           

 

Find Out More:

Related Articles: