
नेटफ्लिक्स, अॅमेझॉननंतर आता एचबीओ मॅक्स करणार धमाका
वॉर्नर मीडियाने आपल्या आगामी स्ट्रिमिंग सर्व्हिस एचबीओ मॅक्सचा ट्रेलर लाँच केला आहे. या जवळपास 1 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्ट्रिमिंग सर्व्हिसवर उपलब्ध होणाऱ्या अनेक क्लासिक चित्रपट आणि शो तसेच ऑरिजनल कंटेटची झलक पाहण्यास मिळत आहे.
नेटफ्लिक्सच्या यशानंतर अनेक फिल्म स्टुडिओ स्वतःची स्ट्रिमिंग सेवा लाँच करत आहे. अॅपल, डिझनी+ नंतर आता एचबीओ देखील या स्पर्धेत दाखल झाले आहे. या व्हिडीओमध्ये एचबीओ मॅक्सच्या स्बस्क्रायबर्सला कोणत्या मालिका, चित्रपट पाहण्यास मिळतील याची झलक आहे. यात बॅटमॅन फ्रेंचायझी, लूनी ट्यून्स कार्टून, फ्रेंड्स आणि बिग बँग थेअरीसह गेम ऑफ थ्रोन्स, मॅट्रिक्स देखील पाहण्यास मिळेल. हॅरी पॉटर्स आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्स सीरिज व्हिडीओमध्ये पाहण्यास मिळत नसली तरी हे चित्रपट युजर्सला प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय एचबीओच्या सर्व मालिका या स्ट्रिमिंग सर्व्हिसवर उपलब्ध असतील. अमेरिकेत एचबीओ मॅक्स सेवा 27 मे पासून सुरू होत आहे. मात्र भारतात ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. https://m.youtube.com/watch?time_continue=6&feature=emb_title&v=oMFtbhoFfTE