रणवीरच्या जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, मात्र चाहत्यांनी लगेच हेरली चूक

Thote Shubham

अभिनेता रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या कॉमेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. स्वतः रणवीरने ट्विट करत या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.  या चित्रपटात रणवीर एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारत आहे. 

 

पोस्टर पाहताना मजेशीर वाटत आहे. पोस्टरमध्ये रणवीर महिलांना पुढे जाण्यापासून रोखत आहेत व त्याच्या मागे पदर डोक्यावर घेतलेल्या महिला दिसत आहेत. गुजराती सिनेमामध्ये काम केलेले दिव्यांग ठक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर मनिष शर्मा हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर मजेदार वाटत असले तरी, सोशल मीडियावर युजर्सनी यातील चूक पकडली आहे.

 

युजर्सनी रणवीर सिंहच्या या पोस्टरसोबत कंगना राणावतच्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाचे देखील पोस्टर शेअर केले आहे. हे दोन्ही पोस्टर एकमेंकाना मिळते जुळते आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये महिला डोक्यावर पदर घेऊन मागे थांबलेल्या आहेत. ‘जयशेभाई जोरदार’ या चित्रपटाआधी रणवीरचा 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.                                                                                                          

Find Out More:

Related Articles: