फोन टॅपिंग करणाऱ्याचा उद्देश काय माहित नाही - एकनाथ खडसे
जळगाव : माझा फोन टॅपिंग करणाऱ्याचा उद्देश काय होता हे सांगता येणार नसून चौकशीअंती हे निष्पन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरू असून त्यांचं मी स्वागतच करेल तर राज्याला याचा भरपूर मोठा फायदा होईल.
तसेच आपल्या जवळचा एक मंत्री केंद्रामध्ये असल्याने वेगवेगळ्या योजना येण्यासही मदत होईल. असे एकनाथ खडसे म्हणाले. दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे. Nrc संदर्भामध्ये लोकांमध्ये एक वेगळी भावना दिसतेय असेही एकनाथ खडसे म्हणाले.