सलमान रियलमी ६ आणि ६ प्रोचा सदिच्छा दूत

Thote Shubham

बॉलीवूडचा दबंग भाईजान सलमानखान स्मार्टफोन ब्रांड रियलमीच्या रियलमी ६ आणि ६ प्रोचा ब्रांड अम्बेसिडर बनल्याची घोषणा कंपनीने बुधवारी केली आहे. सलमान या दोन मॉडेलच्या जाहिराती करणार आहे. विशेष म्हणजे सलमान प्रथमच कोणत्याची स्मार्टफोनचा ब्रांड अम्बेसिडर बनला आहे.

 

रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आमच्या फोन साठी सलमान हाच सर्वात चांगला पर्याय होता. भारताच्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा तो आवडता हिरो आहे. मिडरेंज प्राईज सेगमेंटमधील रिअलमी ६ आणि ६ प्रो ५ मार्चला भारतीय बाजारात लाँच होत आहे. या ब्रांडने नुकताच भारतात एक्स ५० प्रो हा फाईव्ह जी फोन सादर केला आहे.

 

मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉइंटच्या अहवालानुसार २०१९ मध्ये रियलमने तब्बल ४५३ टक्के वाढ नोंदविली असून तो जगातील सर्वाधिक वेगाने वाढलेला स्मार्टफोन ब्रांड ठरला आहे. भविष्यात भारतीय बाजारात कंपनी आणखी चांगली उपकरणे सादर करणार आहे.

Find Out More:

Related Articles: