
‘या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं !’ ईडी चौकशीवरून उदयनराजेंचा पवारांना टोला
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी चौकशी वरून नुकतेच भाजपात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांनीखळबळजनक वक्तव्य केले आहे. या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, दुसरं काय? अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे.
तसेच दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले हे पवारांच्या आठवणी सांगताना रडू लागले होते. त्यांच्या आठवणी सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मात्र आजची उदयनराजेंची प्रतिक्रिया थक्क करणारी आहे.
राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज दुपारी दोन वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून जाणार होते.
मात्र ईडीने पवारांनी चौकशी साठी येण्याची भविष्यातही येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे,
दरम्यान शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार जर आज ईडी कार्यालयात गेले तर मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.