१६ जीबी रॅम सह येणार शाओमीचा ब्लॅक शार्क ३
स्मार्टफोन जगतात नवी क्रांती घडविण्याच्या प्रयत्नात चीनी कंपनी शाओमीने आघाडी घेतली असून त्यांचा तब्बल १६ जीबी रॅमचा ब्लॅक शार्क ३ गेमिंग फोन लवकरच लाँच केला जाणार असल्याची चर्चा आहे. हा ५ जी फोन असेल आणि नवीन ग्राफिकवाल्या गेम्स शौकीनांसाठी हा फोन वरदान ठरेल असा दावा केला जात आहे.
ब्लॅक शार्क ३ फोनसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर दिला जाईल असा अंदाज केला जात आहे. हा फोन अर्थातच महाग असेल. पण चीनी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या फोनची ५ जी बरोबरच ४ जी व्हर्जनही बाजारात आणली जाईल. ४ जी व्हर्जन तुलनेने स्वस्त असेल.
हा फोन पॉवरफुल व्हावा यासाठी कंपनीने विशेष काळजी घेतली असून या फोनची बॅटरी ४७०० एमएएच ची असेल असे संकेत दिले गेले आहेत. चार्जिंग साठी फास्ट चार्जिंग २७ डब्ल्यू टेक या नवीन तंत्राचा वापर केला जाईल. हा फोन म्हणजे ब्लॅक शार्क २ प्रो ची पुढची पिढी असेल. ब्लॅक शार्क २ प्रो जुलै २०१९ मध्ये लाँच केला गेला होता.