BS-6 इंजिनसह ‘होंडा शाईन’ लाँच, देणार अधिक मायलेज
होंडाने आपली लोकप्रिय बाईक होंडा शाईनला बीएस-6 मानक इंजिनसह लाँच केले आहे. कंपनी या व्हेरिएंटची किंमत 67,857 रुपये ठेवली आहे. ही नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक मायलेज देते.
कंपनीने नवीन शाईनमध्ये 124cc 4 स्ट्रॉक एसआय BS6 इंजिन दिलेले आहे. जे 7500 Rpm वर 10.59 Hp पॉवर आणि 6000 Rpm वर Nm टॉर्क जेनरेट करते. सोबतच या इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स ट्रांसमिशन दिले आहे. या बाईकमध्ये सेल्स स्टार्ट आणि किक स्टार्ट सिस्टम देण्यात आली आहे. ही बाईक अधिकच्या व्हेरिएंटच्या तुलनेत 14 टक्के अधिक मायजेल देईल, असा दावा करण्यात आला आहे.
ब्रेक्रिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर यात फ्रंटला 240 एमएम डिस्क ब्रेक, 130एमएम ड्रम ब्रेक पर्याय आणि रिअरला 130 एमएम ड्रम ब्रेक मिळेल. बाईकमध्ये एडजस्टेबल रिअर सस्पेंशन, कॉम्बिंग ब्रेकिंग सिस्टम, डीसी हेडलॅम्प, पास स्विच सारखे फीचर्स मिळतील.
ही बाईक तपकिरी, काळा, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. कंपनी यासोबत 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि 3 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी अशी एकूण 6 वर्षांची वॉरंटी दिली आहे. आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत नवीन व्हेरिएंटच्या आकारात देखील बदल झाला आहे. या नवीन व्हेरिएंटची डिलिव्हरी फेब्रुवारी 2020 अखेर करण्यात येईल.