व्हिडीओ कॉन्फ्रेंस सॉफ्टवेअर बनवा आणि जिंका 1 कोटी रुपये – सरकार

Thote Shubham

सध्या व्हिडीओ कॉलिंगसाठी झूम अ‍ॅप लोकप्रिय ठरत आहे. याच प्रमाणे भारतीय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारतर्फे फंड देण्यात येईल. सरकारने या संदर्भात अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, अर्जाची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे.

 

केंद्र सरकारने एक प्रोग्राम लाँच केला आहे. भारतीय टेक कंपन्या यात सहभागी होऊ शकतात. भारतातच एन्क्रिप्टेड व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात यावा, जो कॉम्प्युटर, लॅपटॉप सारख्या सर्व डिव्हाईसवर चालू शकेल, अशी सरकारची ईच्छा आहे.


ही प्रक्रिया तीन टप्प्यात असेल. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एका टीमला अ‍ॅप डेव्हलपेमेंटसाठी 1 कोटी रुपये दिले जातील. याशिवाय दरवर्षी डेव्लपमेंटसाठी 10 लाख रुपये अतिरिक्त दिले जातील. या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी Mygov.in वर जाऊ शकता. येथे तुम्हाला लॉगइन करावे लागेल, त्यानंतर अ‍ॅप बनविण्याबाबत सविस्तर माहिती मिळेल.


व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग सॉफ्टवेअरमध्ये हे फीचर्स असणे गरजेचे –

  • प्रत्येक प्रकारच्या व्हिडीओ रिझॉल्युशनचे सपोर्ट, लो आणि हाय नेटवर्कमध्ये देखील काम करण्या सक्षम असावे.
  • पॉवर आणि प्रोसेसरचा वापर झाला पाहिजे.
  • यासाठी वेगळ्या हार्डवेअरची गरज लागू नये.
  • व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग दरम्यान चॅट पर्याय असावा. एकावेळी अनेक लोक बोलत असतानाही हा पर्याय असावा.
  • कॉन्फ्रेंसमध्ये सहभागी होण्यासाठी साइन इन आणि विना साइन इनचा पर्याय असावा.
  • नेटवर्क कम्युनिकेशन एन्क्रिप्टेड असावे.
  • ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर असणे गरजेचे. स्क्रीन आणि फाईल शेअर फीचर देखील असावे.
  • व्हिडीओ चॅट दरम्यान वेगवेगळ्या भाषेत कॅप्शनचा पर्याय असावा.
  • अनेकजण व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगमध्ये सहभागी होतील, असा पर्याय हवा.

Find Out More:

Related Articles: