
काश्मीरविषयी पाक भारतासोबत चर्चेला तयार; पण…
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच तांडव सुरू केला आहे. काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जावून स्वत:ची गोचीदेखील पाकने करून घेतली. दरम्यान, सर्व प्रयत्न करून थकलेल्या पाकने आता नवा प्रस्ताव भारतासमोरच ठेवला आहे. पाकिस्तान भारताशी सशर्त द्विपक्षीय चर्चेसाठी तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी म्हंटले आहे.
दरम्यान, शुक्रवारीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले होते की, जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.