
या कंपनीच्या बाईक्सवर मिळत आहेत तब्बल 6.7 लाखांपर्यंत सूट
बीएस6 एमिशन नॉर्म्स लागू होण्याआधी यांची नोंदणी करण्यात आली होती. कंपनीचे काही डीलर्स 1 लाख रुपयांमध्ये बाईकचे बुकिंग करत आहेत.रिपोर्टनुसार, सध्या बाईक दिल्लीमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहक ज्या डीलरशीपची निवड करतील, तेच बाईक शिपिंग आणि ओनरशिप ट्रांसफर प्रक्रिया पुर्ण करेल.
स्कॉट बाँबर बाईक 4.3 लाख रुपये डिस्काउंटसह 11.43 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बाईकची मूळ किंमत 15.73 लाख रुपये आहे. कंपनीच्या शेफ डार्क हॉर्स बाईकवर सर्वाधिक 6.71 लाख रुपये सूट मिळत आहे. या बाईकची मूळ ऑन रोड किंमत 23.67 लाख रुपये आहे. मात्र सूटसह कंपनी बाईकला 16.96 लाख रुपयांमध्ये विकत आहे.