
औरंगाबादेत पुन्हा 24 नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाग्रस्तांची संख्या 651 वर
दरम्यान आतापर्यंत औरंगाबादेतील 113 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सोमवारी कोरोनामुळे दोघांचा बळी गेला. एकूण 15 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. औरंगाबादेत सोमवारी दिवसभरात एकूण 69 कोरोनाबाधित आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 651 वर गेली. सोमवारी दुपारनंतर 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.