कोरोनाचं 'पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’ नाही ज्याचा अर्थमंत्री रोज नवा एपिसोड सादर करतील' - अशोक चव्हाण

Thote Shubham

मुंबई : कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’नाही की जिचा ‘प्रोमो’पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’सादर करावा. अशी खरमरीत टीका राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली आहे. 

 

कोरोना पॅकेज एकाचवेळी जाहीर करणे शक्य असताना ते दररोज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे आश्चर्यकारक असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी दोन दिवसांपुर्वी देशासाठी 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं

 हे पॅकेज जाहीर करत असतांना मोदींनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली नव्हती त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या दोन दिवसांपासून पत्रकारपरिषद घेत या आर्थिक पॅकेजमध्ये कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होणार याची माहिती जाहीर केली आहे. त्यावरून अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हा निशाणा साधला आहे.

 

कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळातील मदत पॅकेज कसे असते ते केंद्र सरकारने समजून घेतले पाहिजे असंही चव्हाण यांनी म्हंटल आहे. अशा पॅकेजमध्ये तातडीची व भरीव मदत तसेच तत्कालीन उपाययोजनांवर भर असला पाहिजे.

 

अर्थसंकल्पात जाहीर करावयाचे दीर्घकालीन उपाय म्हणजे पॅकेज असू शकत नाही नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्राने राज्य सरकारांकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

 

खते, बी-बियाणे, किटकनाशके, कृषी उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. मात्र, त्याऐवजी काही पायाभूत सुविधा व नवीन नियम घोषित करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Find Out More:

Related Articles: