
नाव रामाचं आणि कृती मात्र नथुरामाची ही भाजपची पद्धत- जयंत पाटील
राहुल गांधींना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अत्यंत निंदनीय आहे. भाजपने आपल्या बळाचा वापर करत अनेक आंदोलन चिरडली त्या प्रकारे राहुल गांधी आंदोलन चिरडलं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान, सर्व देशभरातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत युपी पोलिसांच्या वर्तवणुकीचा निषेध केला आहे.तसेच राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.