कोरोना : मर्सिडिज बेंझ पुण्यात उभारणार 1,500 बेडचे हॉस्पिटल
जर्मनीची ऑटोमोबाईल कंपनी मर्सिडिज बेंझ आपल्या पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पात 1,500 बेडचे हॉस्पिटल तयार करणार आहे. कंपनी चाकणमधील स्थानिक प्राधिकरणासोबत मिळून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तात्पुरते हॉस्पिटल उभारणार आहे. या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डचे 1,500 बेड असतील.
कंपनीने सांगितले की, ही सुविधा महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) आवास क्षेत्रात असेल. यात 374 खोल्या आहेत. याशिवाय कंपनीचे कर्मचारी एक-एक दिवसांचा पगार देखील यासाठी देणार आहेत. कर्मचाऱ्यांद्वारे जमा करण्यात आलेल्या रक्कमे एवढीच रक्कम कंपनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे.
कंपनीने सांगितले की, या महामारीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वैद्यकिय सेवेसंबंधी सर्व उपकरण ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये दान केले जाईल. आयसोलेशन वॉर्डचे अन्य सामान जनजातीच्या विद्यार्थ्यांना दिले जातील. मर्सिडिज बेंझच्या आधी अन्य ऑटोमोबाईल कंपन्या मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंडई मोटर्सने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.