महाराष्ट्रात दुपारपर्यंत १३४ नवे रुग्ण, तर मुंबईत १२ तासांत वाढले ११३ पॉझिटिव्ह

Thote Shubham

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट रोज यात आता भरच पडू लागली आहे. महाराष्ट्रात रविवारी दुपारपर्यंत १३४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची राज्यात एकूण संख्या आता १८९५ वर गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.


पुण्यात आज सकाळपासून कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते, असे देखील सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.



दिवसागणिक मालेगावमधील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. मालेगावमध्ये रविवारी सकाळी पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यात दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.

Find Out More:

Related Articles: