अकोल्यात 18 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 186 वर
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या 18 रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तीन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर, आणि बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान एक 62 वर्षीय न्यू भीमनगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल रात्री झाला आहे. ही महिला सोमवार ४ मे रोजी दाखल झाली होती. तसेच काल रात्रीच 41 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आले. हे रुग्ण सिंधी कॅम्प, कृषि नगर, अकोट फैल व बैदपूरा येथील रहिवासी आहेत.