दुख:द – सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान काळाच्या पडद्याआड

Thote Shubham
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांने अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर शुजित सरकार यांनी याविषयी ट्विट केलं. इरफान खानला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. पाचच दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचेही निधन झाले होते. दुर्दैवाने त्यांना आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी जाता आले नव्हते. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.


इरफान खान हा बॉलिवूडमधील प्रतिभावंत कलाकार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. इरफानला दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराचे निदान झाले होते.

परदेशात या आजारावर उपचार करून इरफान खान बरा झाला. भारतात परतल्यानंतर इरफान खानने इंग्रजी मीडियम सिनेमात काम केले. हा सिनेमा इरफानच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला आहे. 

2001 मध्ये 'द वॉरियर' चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. 'द वॉरियर' चे अनेक आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले. 2003 साली आलेला मकबूल चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मकबूल चित्रपटाने इरफानला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर अनेक चित्रपटात मुख्य-सहाय्यक अशा भूमिका त्याने साकारल्या.

2004 मध्ये हासिल चित्रपटासाठी खलनायक म्हणून पहिला फिल्मफेअर अवॉर्ड त्याला मिळाला. 2007 मध्ये आलेल्या मेट्रो चित्रपटाला चाहत्यांकडून पसंती मिळाली. नेमसेकसारख्या चित्रपटांतून आंतरराष्ट्रीय पडद्यावर तो झळकला.

2008 मध्ये स्लमडॉग मिलेनियरमध्ये महत्त्वाची भूमिका त्याने साकारली. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही इरफानच्या कामाचे कौतुक करण्यात आले. लाईफ ऑफ पाय, जुरासिक पार्कमुळं तो जगभरात पोहोचला.


https://mobile.twitter.com/ShoojitSircar/status/1255377784773410818?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed&ref_url=https%3A%2F%2Fd-18277087792105657677.ampproject.net%2F2004240001480%2Fframe.html

Find Out More:

Related Articles: