‘अॅपल सिरी’मुळे वाचले पाण्यात बुडणाऱ्या युवकाचे प्राण
अॅपलच्या आर्टफिशियल इंटेलिजेंस सिरीने एका युवकला नदीत बुडण्यापासून वाचवले आहे. ही घटना अमेरिकेच्या लोवा शहरात घडली. या ठिकाणी एका युवकाची कार चार्ल्स शहरातील नदीत पडली. त्याने सिरीच्या मदतीने 911 वर कॉल केला, तेव्हा त्याला मदत मिळाली व त्याचे प्राण वाचले.
18 वर्षीय गेल साल्सेडो उत्तर लोवा भागातील कम्युनिटी कॉलजे जात होता. तेव्हा त्याची कार रस्त्यावरील बर्फामुळे घसरली आणि वाइनबागो नदीत पडली. गेलने सांगितले की, नदीत कारच्या आत असताना मी खूप चिंतेत होतो. मला काहीच समजत नव्हते. मला वाटले आता मी मरणार आहे, कारण चारही बाजूला पाणी आणि बर्फ होता.
गेलने सांगितले की, भितीने मला माझा फोन देखील सापडत नव्हता. काही वेळ तर मला वाटले की, मी एखाद्याची मदत कशी मागू. तेव्हाच मला अॅपल असिस्टेंट सिरीचा विचार आला. मी जोरात सिरीला आवाज देऊन 911 वर कॉल करण्यास सांगितले. सिरीद्वारे मासोन सिटीच्या अग्निशामक विभागाशी संपर्क झाला.
विभागाचे अधिकारी क्रॅग वॉर्नर यांनी सांगितले की, तापमान कमी असल्याने नदीचे पाणी गोठले होते. यामुळे कारचा ड्रायव्हर साईडचा दरवाजा बंद झाला होता. गेलला खिडकी तोडून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्याची स्थिती आता स्थिर आहे.