कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या देशसेवेसाठी त्यांना सलाम - उदयनराजे भोसले

frame कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या देशसेवेसाठी त्यांना सलाम - उदयनराजे भोसले

Thote Shubham

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खा. उदयनराजे भोसले यांनीही जनतेला घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तर मुंबईत कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिसांच्या प्रती हळहळ व्यक्त केली आहे. उदयनराजे भोसले यांनी हे आवाहन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

 

त्यांनी असे लिहिले आहे की, महाराष्ट्रवासीयांना आमचे आवाहन आहे. कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नका आपल्यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे.

अनेकजणांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबई मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोनामुळे दुःखत निधन झाले.राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.                                      

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More