व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करा, टेलिग्रामच्या फाउंडरचे युजर्सला आवाहन

Thote Shubham

टेलिग्रामचे फाउंडर परेल डुओरोव यांनी फेसबुकचे मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करण्याचे आवाहन युजर्सला केले आहे. परेल म्हणाले की, जर तुमचे फोटो, व्हिडीओ आणि मेसेज सार्वजनिक होण्यापासून टाळायचे असेल, तर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर त्वरित बंद करा.

परेल यांनी टेलिग्राम अकाउंटवर लिहिले की, तुमचे खाजगी फोटो, खाजगी चॅट एखाद्या दिवशी सार्वजनिक होतील. त्याआधी तुमच्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करा. व्हॉट्सअ‍ॅप खरेदी करण्यापुर्वीच फेसबुक खाजगी माहितीच देखरेख करत आहे.

गेली अनेक दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर खाजगी माहिती सुरक्षिततेवरून टीका होत आहे. इस्त्रायलच्या एनएसओ ग्रपने पिगासस स्पायवेअरद्वारे जगभरातील 1400 जणांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून हेरगिरी केली होती. यामध्ये भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता.

सध्या जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 160 कोटी युजर्स आहेत, तर टेलिग्रामचे 20 कोटी युजर्स आ

Find Out More:

Related Articles: