अफगाणिस्तानच्या नेतृत्वात पुन्हा बदल; आता राशिद खान ऐवजी हा खेळाडू असणार कॅप्टन

Thote Shubham

अफगाणिस्तान क्रिकेट संघात कर्णधारपदाचा बदल सातत्याने सुरू आहे. विश्वचषक 2019 पूर्वी संघाने मोठे बदल करत असगर अफगानकडून तीनही क्रिकेट प्रकाराचे कर्णधारपद काढून, कसोटीत रहमत शाह, वनडे सामन्यात गुलाबदीन नाईब आणि टी20चे कर्णधारपद रशीद खानला देण्यात आले होते. 

 

परंतु विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आणि सर्व प्रकारासाठी युवा फिरकी गोलंदाज राशिद खानकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्णधार बदलून संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू असगर अफगाणला पुन्हा एकदा तिन्ही स्वरूपात संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

 

असगरला जेव्हा अफगाणिस्तानच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले गेले तेव्हा संघातील अनेक खेळाडूंनी बोर्डाच्या निर्णयाचा निषेध केला होता. त्यावेळी संघाच्या नेतृत्वात झालेल्या या बदलानंतर नाईबच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विश्वचषकात काही खास कामगिरी करू शकला आणि 9 पैकी एकही सामना जिंकू शकला नाही.

 

त्याचबरोबर टी20मध्ये उत्तम कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा संघ कर्णधार राशिद खान च्या नेतृत्वात प्रभावी कामगिरी करताना दिसत नव्हता. यामुळे पुन्हा एकदा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने असगरला कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे.

Find Out More:

Related Articles: