काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते - एकनाथ खडसे
भाजपने आम्हाला उमेदवारी दिली नाही. याच दुख: नाही पण ज्या लोकांना उमेदवारी दिली आहे तेच लोक भाजपला मतदान करु नका म्हणत होते, भाजपाला शिव्या देत होते, अशा लोकांना उमेदवारी द्यायला नको होती असही ते म्हणाले. एकनाथ खडसे भाजपचे जेष्ठ तसेच नाराच नेते आहेत. काही दिवसांपासून ते नाराज असल्याच दिसत आहेत. वारंवार भाजपला घरचा आहेरसुध्दा त्यांनी दिला आहे. अशातच त्यांनी कॉंग्रेसकडून विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर आलेली. भाजपचे आमदारही मला क्रॉस वोटींग करणार होते. काही आमदार माझ्या संपर्कात होते असही ते म्हणाले.. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं आहे.. दरम्यान, विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने एकनाथ खडसे खवळले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत योग्य व्यक्तींना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे यांची नाराजी उघड झाली होती. एकनाथ खडसे यांना विविध पक्षांकडून पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे.