महिला टी-२० विश्वचषकः भारत-पाकिस्तान महिला संघाचा सराव सामना पावसामुळे रद्द

frame महिला टी-२० विश्वचषकः भारत-पाकिस्तान महिला संघाचा सराव सामना पावसामुळे रद्द

Thote Shubham

ब्रिस्बेन – २१ फेब्रुवारीपासून आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असून सर्व संघामध्ये याआधी सराव सामने खेळवण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात आज यातील पाचवा सामना खेळवण्यात येणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

 

या सामन्याला सकाळी ९ वाजता ब्रिस्बेनच्या अ‌ॅलन बॉर्डर स्टेडियममध्ये सुरूवात होणार होती. पण पावसामुळे मैदान ओले झाले होते. यामुळे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाशी चर्चा करुन सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या सामन्यात नाणेफेकसुद्धा करण्यात आली नाही. दरम्यान पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्याने चाहते निराश झाले आहेत. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी हायव्होल्टेज ठरतो. भारतीय संघ या सामन्याद्वारे टी-२० विश्वचषकात विजयी शुभांरभ करण्यास उत्सुक होता.                                                                                                                                                                  

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More