देशभरातील देवस्थानांकडे असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्या - पृथ्वीराज चव्हाण
सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्या, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं होतं
केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्यावं. जागतिक सोनं परिषदेच्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.