हैदराबाद टी२०आधी मोहम्मद अझरुद्दीन यांचा झाला असा मोठा सन्मान

Thote Shubham

हैदराबाद। काल(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याआधी राजीव गांधी स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडला मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव देण्याचा एक छोटासा सोहळा पार पडला. अझरुद्दीन यांच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हस्ते झाले. 

 

लक्ष्मणने रिबन कापून स्टँडचे उद्घाटन केले. यावेळी माजी भारतीय ऑफस्पिनर नोएल डेव्हिड, वेंकटपथी राजू आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही उपस्थित होते. सध्या मोहम्मद अझरुद्दीन  हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली हा सामना प्रथमच खेळला गेला आहे. 

 

अझरुद्दीनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत भारतीय क्रिकेट संघाकडून 99 कसोटी आणि 232 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 22 शतकांसह 6215 धावा केल्या आणि वनडेत 7 शतकांसह 9378 धावा केल्या आहेत. तसेच 2000 च्या दरम्यान सामना फिक्सिंग प्रकरणात अडकल्यावर त्याच्या कारकिर्दीत ब्रेक लागला होता, परंतु नंतर कोर्टाने त्याना क्लीन चिट दिली.

 

Find Out More:

Related Articles: