मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललोय, माफी मागणार नाही – वारीस पठाण

Thote Shubham

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

 

याच पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिला. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

मात्र वारीस पठाण यांनी माफी मागण्यास नकार दिला असून भाजपाला शाब्दिक निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलतना वारीस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे,’ असे ते म्हणाले.

 

दरम्यान, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. “ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार वारीस पठाण यांनी एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्यात मग्रुरी आहे. माज आहे. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून म्हणतात, आपण “१५ कोटी आहोत, पण १०० ला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट!” ‘१००ला भारी’ म्हणजे नेमके कोणाला हे १५ भारी पडणार? हिंदूंनाच ना! हिंदुस्थानात राहून हिंदूंनाच धमकी देतोय हा उपटसुंभ!

 

Find Out More:

Related Articles: