
टेलीग्रामचे खास फिचर देणार व्हाट्सअॅपला टक्कर
नवी दिल्ली : व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी मॅसेजिंग अॅप टेलीग्रामने खास फिचर आणले आहे. युजर्सला या फिचर्सनुसार आपल्या मनानुसार थीमसोबत मॅसेज पाठवता येणार आहे. जास्तीत जास्त युजर्ससोबत टेलीग्रामला जोडण्यासाठी हे नवीन फिचर्स आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच आपल्या युजर्सला टेलीग्राम मॅसेज शेड्यूल करण्याची सुविधाही देण्याची शक्यता आहे.
अॅपला जास्तीत जास्त फ्लेक्सिबल करण्याचे टेलीग्राम कंपनीकडून प्रयत्न असल्यामुळे जास्तीत जास्त लोक टेलीग्रामसोबत जोडले जातील. आपल्या युजर्ससाठी टेलीग्राम वेगवेगळे मोड आणण्याच्याही विचारात आहे. या अॅपमध्ये व्हाइट आणि डार्क मोड याअगोदरच इनबिल्ट आहे. युजर्ससाठी हे फिचर्स जास्तीत जास्त फ्रेंडली करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
ज्यात कलर चेंज करणे, टेक्स्ट फॉन्ट वेगळ्या फॉर्मट लिहिण्यासोबत युजर्स आपल्या आवडीनुसार थीम निवडू शकतो. ‘सेंड व्हेन ऑनलाईन’ फिचर शेड्यूल करण्यासाठी टेलीग्राम घेऊन येणार आहे. समोरचा व्यक्ती यामध्ये ऑनलाईन नसला तरी तुम्ही त्याला मॅसेज पाठवू शकता. समोरचा व्यक्ती ज्याक्षणी ऑनलाईन येईल त्यावेळी त्याला तुमचा मॅसेज तात्काळ दिसेल. नवीन व्हर्जनला युजर आपल्या पद्धतीने वापरू शकणार आहे. कारण, यात कस्टमाईजची सुरुवात आहे.