आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार - इंदुरीकर

Thote Shubham

शिर्डी : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादावर इंदुरीकर महाराजांनी काल रात्री केलेल्या किर्तनात भाष्य केल. “दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले.

 

“यू ट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.  या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.

 

इंदुरीकर महाराज काय म्हणाले? 

यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा(अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी.

 

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो.. आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.

 

एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास..  काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदुरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.

Find Out More:

Related Articles: