अमृता फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना आवाहन, म्हणाल्या भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक
मुंबई वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महिला शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. आणि औरंगाबादमधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडिता जीवन मृत्यूशी संघर्ष करत आहे. या घटनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचल्याचे दिसत आहे. त्या म्हणतात की आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार अॅसिड हल्ल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक” आहे.
या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ या ॲसिड ॲटॅक पीडितांसाठी असलेल्या योजनेतील सवलती हिंगणघाट पीडिताला देण्यात याव्या आणि महिला आयोग अध्यक्षपद लवकर भरण्यात यावे. माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1225373810964066304?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1225373810964066304&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F